ब्रेकिंगगोरेगाव मिरर
ठाकरे सेनेला धक्का:सुभाष देसाईंचे पुत्र भूषण शिंदेच्या शिवसेनेत …

मुम्बई,दि.13(प्रतिनिधी)एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आजवर अनेक नेत्यांनी प्रवेश केला. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत वर्षानुवर्ष एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी देखील ठाकरेंना राम राम केला.
दरम्यान आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ असेलेले सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.