गोरेगाव मिररब्रेकिंग

तापसी पन्नू, अनुराग कश्यप, आणि अन्य बॉलिवूड कलाकारांवर इन्कमटॅक्सच्या धाडी..

मुंबई,दि.३:तापसी पन्नू, अनुराग कश्यप, आणि अन्य बॉलिवूड कलाकारांवर आयकर विभागाने आज धाडी टाकल्यामुळे  बॉलिवूडमध्ये  प्रचंड खळबळ ऊडाली आहे.इन्कम टॅक्स विभागा ने आज मुंबईतील  अनेक बॉलिवूड कलाकारांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहल यांचा समावेश आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु झाले. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांवर 2015 मध्ये आलेल्या फँटम या सिनेमाशी संबंधित व्यवहारावरुन धाडी पडल्या आहेत. अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती करत आहेत.

या कलाकारांनी आयकर चोरी केल्याचा संशय आहे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून होत आहे.
अनुराग कश्यपच्या कंपू मधील लोकांवर सध्या इन्कम टॅक्स लक्ष वेधत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मंटेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे.

मधु मंटेनाची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही प्राप्तिकर अधिकारी पोहोचले आहेत. हा छापा का टाकला यामागील कारण अद्याप समोर आले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!