कोंकणमहाराष्ट्रमुंबई
भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं ,महिलांसह १५ जणांचा मृत्यू

राजस्थान : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात (मंगळवार) दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. जैसलमेर येथून जौधपूरला निघालेल्या आणि प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका खासगी बसला अचानक आग लागली. ही घटना इतकी भीषण होती की, काही मिनिटातच संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांमध्ये वेढल्या गेली. या दुर्घटनेत तीन मुलं, चार महिलांसह एकूण १५ प्रवाशांचा जळाल्याने मृत्यू झाला.
ही दुर्घटना घडली तेव्हा बसमध्ये एकूण ५७ प्रवासी होते. बसने पेट घेतल्याने घटनास्थळी प्रचंड धावपळ उडाली, प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर व्यापून गेला. अशावेळी स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेत शक्य होईल तेवढ्यांचा जीव वाचवला.