सिंधुदुर्गात झालेली घटना हा भाजप-शिवसेनेचा वाद नव्हे -मंत्री उदय सामंत

रत्नागिरी– सिंधुदुर्गांत सध्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचे पडसाद राज्यात देखील उमटू लागले आहेत.संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप नितेश राणेंवर लागल्याने पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचा वाद राज्यात रंगलाय.यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना,’सिंधुदुर्गात काही घडले की राणे विरूध्द शिवसेना घडते असे नाही.सिंधुदुर्गात परवा घडलेला प्रसंग हा भाजप शिवसेनेमधील वाद नाही असे’, मत मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गातील घडलेल्या घटनेबाबत रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे शिवसेनेत आल्यानंतर ही घटना घडली आहे. त्यानंतर संतोष परब यांच्यावर वार झाल्यानंतर या प्रकरणी सहा लोकांना अटक झाल्यानंतर दिल्लीतून माणूस पकडण्यात आला आहे.
त्याने जे काही पोलिसांना सांगितलं आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. हा विषय सध्या कोर्टात असल्याने व सुनावणी सुरू असल्याने यावर मी राजकारणी म्हणून बोलणे योग्य नाही कारण त्यामुळे केसवर परिणाम होऊ शकतो’, असेही सामंत यांनी सांगितले.