महाराष्ट्र

मुंबईसह राज्यात कोरोना ऊतरणीला…

मुंबई :- राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्यत आता उतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या २४ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ४५ हजार ६४८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

तर दुसरीकडे राज्यात आज ११० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत ३०४० ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी १६०३ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

मुंबईतील कोरोना परिस्थिती:-
आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत शुक्रवारी १ हजार ३१२ नवे रुग्ण आढळले असून १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ५९१ झाली आहे. तर मागील २४ तासांत तब्बल ४ हजार ९९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट एक टक्क्याने वाढून ९७ टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!