महाराष्ट्र

विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी, मनाई आदेशाचे उल्लंघन; आमदार नाईकांसह नवनिर्वाचित नगराध्यक्षांवर गुन्हा

कुडाळ : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्यासह महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर लोकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण होईल, असे हयगयीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार स्वप्नील तांबे यांनी याबाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीदरम्यान नगरपंचायत कार्यालयाजवळ शिवसेना- काँग्रेस तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमवून, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, आबा धडाम यांच्यासह अन्य ४० ते ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, नगरसेविका सौ.अक्षता खटावकर, सौ.सई काळप, सौ.श्रृती वर्दम, सौ.ज्योती जळवी, सौ.श्रेया गवंडे यांच्यावरही कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!