महाराष्ट्रकोंकणदेशविदेशशैक्षणिक

USA – NASA STUDY TOUR 2025 : रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांचा थेट नासामध्ये होणार अभ्यास! दौऱ्याआधी पालकमंत्री उदय सामंतांची घेतली भेट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद व रत्नागिरी नगर परिषद यांच्या प्राथमिक शाळांतील २० हुरार विद्यार्थ्यांची निवड USA NASA Shutly Tour 2025 साठी झाली असून, या सर्व विद्यार्थ्यांनी आज मुंबई येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांची भेट घेतली.

एक अतिशय अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. या उपक्रमाच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून इतक्या विद्यार्थ्यांना नासाच्या अभ्यासदौयासाठी पाठवले जात आहे हे रत्नागिरीसाठी गोरवाचे आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणेचे क्षण आहेत.

विज्ञान आणि संशोधनाच्या वाटचालीत उडी घेणाऱ्या या नव्या पिढीचे हे पहिले पाऊल त्यांना एक नवी दिशा देईल, याचा विश्वास वाटतो. शिक्षण, जिद्द आणि स्वप्नांच्या बळावर रत्नागिरीच्या मातीतून थेट नासापर्यंतचा प्रवास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे यावेळी  उदय सामंत ह्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!