भारतात प्रथमच कफ खोकला क्लिनिक संकल्पना

मुंबई / रमेश औताडे : भारताच्या आरोग्यसेवेच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला असून आता सर्दी कफ साठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडणार नाही कारण आता भारतात प्रथमच कफ क्लिनिक संकल्पना सुरू झाली असल्याची माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य समूह अधिकारी प्रशांत शिंदे यांनी दिली.
केनव्ह्यू इंडिया आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले कफ खोकला क्लिनिक सुरू करण्यात येत आहे. भारतामधील सर्वात दुर्लक्षित पण सामान्य लक्षण असणाऱ्या खोकल्याचे निदान आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे समूह सचिव डॉ अगम व्होरा यांनी सांगितले.
भारतात खोकला ही बाह्यरुग्ण विभागातील क्रमांक एक ची तक्रार असली तरीही त्यासाठी एकसंध उपचार पद्धती अभावानेच आढळते. आमच्या कफ क्लिनिक च्या माध्यमातून नवीन वैज्ञानिक दृष्टीकोन, निदान शिस्त, आणि सामान्य चिकित्सकांसाठी प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार आहे. असल्याचे डॉ हर्षद माळवे यांनी सांगितले.