महाराष्ट्रमुंबई

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली

मुंबई :  जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला.या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली.

पाकिस्तान बरोबर आता आरपार ची लढाई केली पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवाद समूळ नष्ट केला पाहिजे. पाक ला एकदा युद्धाचा एकदा जोरदार शॉक दिलाच पाहिजे असे ना.रामदास आठवले यांनी आज सांगितले.

बांद्रा पूर्व येथील आतंकवाद विरोधी निषेध रॅलीचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश तर्फे करण्यात आले अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिले.रिपब्लिकन पक्षाच्या आतंकवाद विरोधी रॅली चे नेतृत्व रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; मुंबई सरचिटणीस विवेक पवार जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड; संजय पवार; अजित रणदिवे; प्रकाश जाधव; संजय डोळसे रवी गायकवाड यांनी केले.महिला आघाडी च्या ॲड आशाताई लांडगे; अभया सोनवणे उषाताई रामलू तसेच रिपाइं चे श्रीकांत भालेराव;सोहेल शेख; योगेश शिलवंत विजय वंजारी भारती गुरव; रत्ना शिंदे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!