महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

इंदिरा गांधी यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेली अंगणवाडी आजही मागण्याच्या प्रतीक्षेत

मुंबई / रमेश औताडे : भारतात १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंगणवाडी योजना लागू केली . आज ५० वर्ष झाली या योजनेला . एका पंतप्रधान महिलेने सामान्य महिलेसाठी सुरू केलेली ही योजना देशाची भावी पिढी सुसंस्कृत करण्याचा श्रीगणेशा अंगणवाडीतून होत असतो. अशा या अंगणवाडी योजनेतील सेविका आपल्या मूलभूत मागण्यासाठी आंदोलन , मोर्चे काढून सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. ही ५० वर्षातील मोठी शोकांतिका आहे.

दोन लाख अंगणवाडी केंद्रातील २ लाख सेविका व २ लाख मदतनीस असे ४ लाख महिला संविधानिक पद असताना मानसेवी म्हणून सेवा करत आहेत. राज्यभरात ७ संघटना या ४ लाख महिलांचा प्रश्न घेऊन लढत आहेत. शुभा शमीम , आर माय टी इराणी , एम ए पाटील , ब्रुजपाल सिंग असे कामगार नेते यांच्यासाठी आंदोलन करत आहेत.

उन्हाळा पावसाळा असो , निवडणुका असो किंव्हा आरोग्याचा प्रश्न असो अंगणवाडी सेविका आपली जबाबदारी मोठ्या मेहनतीने पार पाडतात. त्यानंतरही गेल्या ५० वर्षांपासून अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांना वेतना ऐवजी केवळ मानधन दिले जात आहे. सरकारने मागण्यांबाबत वेळोवेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सरकारच्या आश्वासनावर पोट भरते का ? असा सवाल अंगणवाडी सेविका करत आहेत .

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अंगणवाडीतील महिलांना अंगणवाडीच्या खोलीचे ७५० भाडे आणि लाईट बिल वेळेवर दिले जात नाही. अधिवेशन सुरू झाले की आपला आवाज सरकारदरबारी ऐकला जावा यासाठी वर्षानुवर्ष आंदोलन करावे लागत आहे.असे स्नेहा सावंत यांनी सांगितले.

महागाईमुळे कुटुंब चालवणे कठीण

२५ वर्षे अंगणवाडीत काम करणाऱ्या लक्ष्मी जोशी या महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले की, वाढत्या महागाईमुळे कुटुंब चालवणे कठीण झाले आहे. कामाचे तास निश्चित नाहीत. ग्रामीण भागात तालुक्याला मीटिंगला जाण्याचा प्रवास भत्ता मिळत नाही. सरकारच्या विविध योजनांची कामे करताना काळ वेळ न पाहता करावी लागतात.

सेविकेला किमान वेतन २६ हजार व मदतनीस ला २० हजार मिळावे , ग्रॅज्युटी , आदी सर्व लाभ मिळावे कारण सर्वोच्य न्यायालय यांचे आदेश आहेत की ही सेवा संविधानिक आहे. मानसेवी नाही.अशी माहिती डॉ. सत्तार खान यांनी दिली.

आता नागपूरला आंदोलन करण्यास निघालेल्या या अंगणवाडी महिलांच्या मते , आता तरी आमच्या मागण्या मान्य करा व आमचे हे शेवटचे आंदोलन ठरू दे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुरू केलेली ५० वर्षाची ही योजना पुन्हा एकदा भावी पिढी सक्षम करण्यास आनंदाने कामाला लागू दे.अशी मागणी अंगणवाडी महिला करत आहेत. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!