शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या चौघा संशयितांना पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन मतांचा अधिकार असणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या चौघा संशयितांना पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले आहे.त्यांना पोलिस चौकशीसाठी दि.२३ डिसेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान भाजपा व शिवसेना नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
मात्र, हा हल्ला नेमका कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दि.१८ रोजी फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी संतोष परब वर हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार क्र. MH 14- BX – 8326 ही कार ताब्यात घेतली. तसेच आतील चारही संशयितांना ताब्यात घेऊन ओरोस पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
स्वत: पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाज्याआड कसून चौकशी केली. मात्र चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही.