मुंबई

कोकणातील पूरग्रस्तांसाठी जे. जे. हॉस्पिटल मधील तृतीय श्रेणी संघटनेचा मदतीचा हात.

मुंबई:कोकणामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित तसेच नैसर्गिक हानी झाली आहे. अनेकांची घरे, जनावरे या अतिवृष्टीमध्ये वाहून गेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वास्तूचे नुकसान झालेले आहे .याकरिता शासन/केंद्र शासन आपल्या परीने मदत करीत आहे.

कोकणवासीयांसाठी मदतीचा हात देऊन कोकणातील या नुकसानग्रस्त बांधवांना सढळ हस्ते मदत करून त्याचे कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना द्वारे केलेल्या दोन ते तीन दिवसाच्या आव्हानाला जे.जे हॉस्पिटलमधील तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेने प्रतिसाद दिला व परत एकदा दाखून दिले की संघटना म्हणजे एक कुटुंब आहे.जे.जे हॉस्पिटलमधील तृतीय श्रेणी कर्मचारयांनी सव्वीस हजार आठशे एकसष्ठ रुपये मदत निधी म्हणून संघटनेकडे जमा केले . त्या बद्दल संघटनेच्या सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री. सुरेश तांबे सरचिटणीस श्री.अरुण जाधव खजिनदार श्री. रामदास गोळे व संघटनेचे पदाधिकारी यांनी सर्व कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार मानले आहेत. हा सर्व निधी बृहन्मुंबई राज्य सरकारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, सरचिटणीस अविनाश दौंड यांना सुपूर्द करण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे अशीच परिस्थिती उदभवली होती तेव्हा देखील संघटनेने कपडे,भांडी आणि शालेय उपयोगी वस्तू पाठवल्या होत्या.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे आदर्श नेतृत्व र.ग. कर्णिक साहेबांनी घालून दिलेल्या आदेशानुसार संघटना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली असून या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकारी कर्मचारी नेहमीच अशी भरगोस मदत गोळा करून आपत्तीग्रस्त लोकांच्या मदतीस पुढे येत असल्याचे जे.जे.हॉस्पिटल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तांबे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!