या’ कारणासाठी लवकरच होणार देशभरातील टोल नाके बंद !

‘नवी दिल्ली : देशभरातील सर्व टोल प्लाझा लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
मात्र टोल नाके बंद झाले तरी टोल वसुली करणे सरकार सोडणार नसून जीपीएस तंत्र वापरून टोल चे पैसे आपोआप सरकारकडे वळते होणार आहेत.केंद्र सरकार जीपीएस आधारित टोल प्रणाली व्यवस्था आणण्याची तयारी करत आहे. या मुळे देशातील सर्व टोल प्लाझा बंद करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय उद्योग संघटनेच्या (सीआयआय) कार्यक्रमात ही माहिती दिली.
देशातील टोल प्लाझा बंद करून त्याऐवजी जीपीएस आधारित टोल प्रणाली व्यवस्था म्हणजे सोप्या भाषेत वाहन चालक वाहन टोल असलेल्या मार्गावर घेवून जाईल तेव्हा जीपीएस आधारित टोल प्रणाली स्वयंचलित पद्धतीने टोल वसूल करेल. त्यामुळे टोल प्लाझावर लागणार्या रांगांमध्ये थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.






