महाराष्ट्रमुंबईराजकीय

एसटीच्या मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सध्या १० लाख वापरकर्ते

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाने मोबाईल ॲप काही महिन्यांपूर्वी सुधारणा करुन नवीन आवृत्ती (व्हर्जन) मध्ये सुरू केले आहे .त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बस स्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात, प्रवासाची माहिती तपासू शकतात.

१ एप्रिल २०२५ पासून सुरू केलेल्या नवीन MSRTC BUS RESERVATION ॲप ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून मार्च-२०२५ मध्ये ३ लाख ९४ हजार प्रवाशी जुन्या मोबाईल ॲपचा वापर करीत होते. सुधारित ॲप आल्यानंतर मे-२०२५ मध्ये सुमारे ६ लाख ७२ हजार प्रवाशांनी नवीन मोबाईल ॲपचा वापर केला आहे. सध्या १० लाख वापरकर्त्यापैकी सरासरी दरमहा ५ लाख प्रवासी सुधारित मोबाईल ॲपवरून तिकीट काढत आहेत.

तब्बल १ लाख २५ हजार प्रतिक्रिया
ॲप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांनी आपला अनुभव, ॲप बद्दलच्या सुचना, तक्रारी या बाबतीत भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अर्थात , वापरकर्त्यांच्या तक्रारी व सूचना या संदर्भात काही आव्हानं आहेत. नेटवर्क कव्हरेज कमी असलेल्या ग्रामीण भागात रिअल-टाइम माहिती व डिजिटल पेमेंटची सेवा सतत उपलब्ध नसल्याचे तक्रारीत दिसून येतात. तसेच, ज्येष्ठ नागरिक किंवा तांत्रिकदृष्ट्या पारखी नसलेल्या प्रवाशांसाठी ॲपचा वापर अवघड असल्याचेही काही प्रतिक्रिया आहेत. “ग्रामीण भागांतील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने स्थानिक सुविधांचा विचार करून ॲपचे UI/UX अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे.

एस.टी.च्या मोबाईल ॲपला प्ले स्टोअर ॲप मध्ये ४.६ स्टार चे रेटिंग मिळाले आहे. अर्थात, या ॲप ला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद हा आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एक महत्त्वाच्या टप्प्याचे संकेत देतो. तंत्रज्ञानाचा वापर योग्य नियोजन व स्थानिक अडचणींचा विचार करून केला तर प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित व पर्यावरणपूरक सेवा मिळण्याची शक्यता वाढते. हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

प्रताप सरनाईक
परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एस टी महामंडळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!