ब्रेकिंग

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केल्याने राष्ट्रवादीचे खा.अमोल कोल्हे अडकले नव्या वादात

मुंबई- ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा.अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत.त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे.

याबद्दल कोल्हे म्हणाले, मी २०१४ ते २०१६ या कालावधीत शिवसेनेमध्ये सक्रिय होतो. नंतर तेथूनही मी दूर झालो. २०१९ मध्ये मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मधल्या काळात म्हणजे २०१७ मध्ये मी हा सिनेमा केला होता. तो सिनेमा प्रदर्शित होणार की नाही, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून होता. अचानक तो चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे मला कळाले.

मी आजपर्यंत कधीही गांधी हत्येचे समर्थन केलेले नाही, तसेच नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरणही मी कधी केले नाही. मात्र, एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करायला मिळणे याचा अर्थ आपण तसे आहोत, असा होत नाही.मी जर एखाद्या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली, तर मी खऱ्या आयुष्यात खलनायक होतो का? वैचारिकदृष्ट्या आपण जी भूमिका करतो, त्याच्याशी आपण सहमत असतोच असे नाही

‘कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही’-जितेंद्र आव्हाड यांचा अमोल कोल्हेंना इशारा

दरम्यान या चित्रपटावरुन आता खुद्द राष्ट्रवादी पक्षातही वाद निर्माण झाला आहे खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना जाहीर विरोध करण्यात येत आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यासंदर्भात विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!