मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले तब्बल 47 विषारी साप…
मुंबई – मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४७ विषारी साप आढळून आले आहेत. सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली असून तो भारतीय नागरिक आहे. थायलंडवरून परतत असताना अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत (वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अॅक्ट) हे साप जप्त करण्यात आले आहेत. या या प्रवाशाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. त्याची सध्या तुरुगांत रवानगी करण्यात आली केली. कस्टम अधिकाऱ्यांनी एक्सवर एका डिशमध्ये रंगीबेरंगी सापांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. 44 इंडोनेशियन पिट साप, 3 स्पायडर- टेल्ड हॉर्ड साप आणि 5 एशियन लीफ कासवं असल्यांच, या पोस्टमध्ये अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र हे साप कुठून आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या आधीही वन्यजीव तस्करीच्या घटना भारतात प्राण्यांची आयात करणं बेकायदेशीर नाही, पण वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार काही विशिष्ट प्रजातींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी किंवा सरकारकडून संरक्षित करण्यात आलेल्या प्राणांचा समावेश आहे. त्यामुळे विदेशातून भारतात कोणत्याही वन्य प्राण्याची आयात करताना प्रवाशाने संबंधित विभागाची परवानगी आणि परवाने घेणं बंधनकारक आहे.