ब्रेकिंग

दिलासादायक: १ एप्रिलपासून वीजदर होणार 2 टक्क्यांनी कमी..

विज नियामक आयोगाचे निर्देश

मुंबई दि ४ : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने  १ एप्रिल पासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण  सामान्य नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबतच्या माहितीनुसार मार्च २०२०मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीज दर कमी करण्यात आले. तर या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार महावितरण – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून १ टक्के तर बिगर रहिवाशीसाठी कंपनी, उद्योगाना २-५टक्के.
बेस्ट – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ०.१ टक्के तर बिगर रहिवाशी, कंपनी, उद्योग  यांना ०.३-२.२ टक्के
अदानी – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून 0.३ टक्के तर बिगर रहिवाशी, कंपनी, उद्योग यांना १.४-१.६ टक्के
टाटा – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ४.३ टक्के तर बिगर रहिवाशी, कंपनी, उद्योगाना  १.१.-५.८टक्के दर आकारणी करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!