धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात- संभाजी भिडे यांची राज्य सरकारवर टीका

सांगली:- राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपानं या निर्णयाला विरोध केला असताना आता शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा एकसुद्धा मंत्री, आमदार ‘असा निर्णय करणार असेल तर मी आमदारकीवर, मंत्रीपदावर थुंकतो, तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही’, असं म्हणून बाहेर पडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही’, असं संभाजी भिडे म्हणाले.
दरम्यान राज्यसरकारच्या या निर्णयाला राज्यातून मोठया प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.याचं धर्तीवर येत्या काळात राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.