सुरिनामच्या भारतातील राजदूत हनीषा जयराम यांची महाराष्ट्र विधिमंडळाला सदिच्छा भेट

मुंबई, दि. २२ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी / वार्ताहर)

सुरिनाम देशाच्या भारतातील राजदूत माननीय श्रीमती हनीषा जयराम यांनी गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील महाराष्ट्र विधिमंडळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर यांनी त्यांचे स्वागत केले.

सुरिनाममध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय असून, भारत आणि सुरिनाम या दोन्ही देशांमध्ये राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारविषयक संबंध मैत्रीपूर्ण व दृढ आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, विविध क्षेत्रांमध्ये व्यापाराच्या संधी वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राजदूत श्रीमती हनीषा जयराम यांनी यावेळी सांगितले.

या भेटीदरम्यान श्रीमती जयराम यांनी महाराष्ट्र विधानसभेसह विधानपरिषदेच्या सभागृहालाही भेट दिली. भारत आणि सुरिनाम यांच्यातील व्यापारविषयक सहकार्य अधिक वाढावे आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ व्हावेत, अशी सदिच्छा विधानपरिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाच्या सचिव-२ श्रीमती मेघना तळेकर-इटकेलवार, सचिव-३ डॉ. विलास आठवले, सचिव-४ श्री. शिवदर्शन साठ्ये तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतींचे सचिव श्री. पंडित खेडकर उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!