धक्कादायक! परमेश्वराचे बोलावणं आलं? 20 जण देहत्याग करणार; महाराष्ट्रात खळबळ, पुणे, जतमधील भाविक

महाराष्ट्र: परमेश्वराचं बोलणवणं आलं आहे त्यामुळे आम्ही देहत्याग करणार असल्याचे तब्बल 20 भाविकांनी जाहीर केले आहे. कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील अंनतपूर येथील पाच भाविकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाविक देखील यामध्ये आहेत. जत तालुक्यातील एक महिला आणि पुरुष भक्त देखील देहत्याग करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
देहत्याग करण्याच्या भक्तांच्या घोषणेनंतर प्रशासन देखील हादरून गेले आहे. सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान अनंतपूर येथे महापूजा होणार आहे. या महापूजेचा समारोप देहार्पणाने होणार आहे. हे सर्व भक्त रामपाल महाराज यांचे आहेत. देहत्याग करण्याची घोषणा करणाऱ्या तुकाराम इरकर याने सांगितले की, त्यांनी रामपाल महाराजांकडून दिशा घेतली आहे. महाराजांकडून तीर्थ घेत आम्ही देहासह वैकुंठाला जाणार आहोत. देहत्याग करणाऱ्या 20 भक्तांमध्ये मुळचे उत्तर प्रदेशमचे असलेले मात्र पुण्यात स्थायिक झालेल्या 10 भाविकांचा समावेश असल्याची माहिती आहे. अनंतपूर आणि विजयपूर येथील दहा भाविक असे मिळून 20 भाविक देहत्याग करणार आहे. प्रशासनाला हा देहत्याग करण्याविषयीची माहिती मिळताच चिक्कोडचे पोलिस उपअधिक्षक, तहीलदार यांनी गावात जात देहत्याग करण्याची घोषणा करणाऱ्या परिवाराचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तुकाराम इरकर यांचे कुटुंब आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कायदेशीर कारवाई करत त्यांना थांबवले जाण्याची शक्यता आहे.